
अर्जुनी मोरगाव,-येथील बिरसा मुंडा स्मारक समीती सिंगलटोलीच्या वतीने महान क्रांतिकारी,आदिवासींचे प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.सेवा समीती अध्यक्ष लिलाधर ताराम यांच्या. अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आदिवासी एम्पलाईज फेडरेशन मुंबईचे
प्रा.राम प्रधान,तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत मडावी उपस्थित होते.कोरोणा संकर्मनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सामाजिक अंतर पाडीत सम्पन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतळ्याचे पूजन आणि माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाला समीतीचे सचिव मुरारी पंधरे ,यशवंत कुंभरे, मोहन नाईक ,वामन नाईक ,रामेश्वर करचाल,आनंद मडावी,पंचम भलावि,केशवराव गावळकर,नेतराम मलगाम,भास्कर राउत,गीरीधर राउत ,नगरसेविका ऊर्मिला जुगनाके उपस्थित होते.