काँग्रेसने साजरी केली स्व. इंदिरा गांधीची 103 वी जयंती

0
258

गोंदिया,दि.20ः जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेसच्यावतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची 103 वी जयंती मोठया उत्साहात जिल्हाभर साजरी करण्यात आली.
काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यालयात गोंदिया जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष डाॅं.एन.डी. किरसान यांचे अध्यक्षतेखाली जयंतीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी स्व. इंदिराजी गांधी यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. इंदिराजीनी त्यांचे जिवनात फार सघंर्ष केला. त्यांनी देषाची प्रतिष्ठा संपुर्ण जगात प्रस्थापित केली. बॅकाचे, विमा कंपण्याचे राष्ट्रीयकरण करुन त्यांचे कार्यकाळात सार्वजनिक क्षे़़त्रात एकुण 66 उपक्रम स्थापीत करण्यांचे मोलाचे कार्य केले. तसेच बॅकांचे जाळे ग्रामीण स्तरावर पोहचविण्याचे कार्य केले. 1971 मध्ये पाकिस्तान सोबत युध्द करुन बंगला देषाची निर्मिती केली. देषाला विकासाच्या मार्गावर नेण्याचे कार्य केले. गरिबी हटावचा नारा त्यांनी सर्वप्रथम दिला. देषाला अन्न धान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करुन परिवार नियोजनाचे महत्वाचे कार्य केले. त्यांनी देषाच्या एकता व अंखडतेसाठी आपल्या जिवनांचे बलिदान दिले. इदिराजी गांधी यांचे देश उभारणीत मोलाचे योगदान विसरता येणार नाही, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात डाॅं. किरसान यांनी केले.
यावेळी प्रदेश सचिव विनोद जैन,अमर वराडे, बलजीतसिंग बग्गा, महिला प्रतिनिधी वदंना काळे, यांनी त्यांच्या भाषणातून  श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन युवक काॅंग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, यांनी केले. यावेळी इंदिराजी गांधी यांच्या जिवन पट उलगडणारी भिती चित्रे लावण्यांत आलेली होती. कार्यक्रमाला नफीस सिध्दीकी, दलेश नागदवनेे , महेंद्रसिंह रवतवार, दिलीप गौतम, परवेज बेग, दिपेश अरोरा, बाबा बागडे, रामेष्वर लिल्हारे, बावनकरजी बडेवाले, एन.एस. लिल्हारे, निकेश मिश्रा, सुषील खरकाटे, रीतेश मेंढे, दिपक उके, अमन तिगाला, राजकुमार रोकडे, अमर राहूल, किर्तीकुमार येरणे, मजहर खान, नसाीब शेख, संकेत कठाने, शैलेश बिसेन, पारस लिल्हारे, अर्पीत बन्सोड, अहमद मनीयार, व अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.