राजू बन्सोड यांचे निधन

0
670

तिरोडा,दि.22 : येथील रेल्वे स्टेशन परिसर येथील रहिवासी राजेंद्र (राजू) बन्सोड यांचे (जि.२१) पहाटे ५.00 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांना ह्रदय विकाराच्या तीव्र धक्का बसला. मृत्यू समयी ते ६0 वर्षाचे होते.
राजेंद्र बन्सोड महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गोंदिया येथून अधीक्षक म्हणून ते सेवानवृत्त झाले. काही काळ त्यांनी जिल्हा परिषद गोंदिया येथे सुद्धा कार्य केले. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राजूभाऊ महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे सदस्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कोषाध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने अपरिमित सामाजिक हानी झाली आहे. स्थानिक रेल्वे स्टेशन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.