साकोली: वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अंतर्गत वैनगंगा पॉलीटेक्निक साकोली येथे माझी वसुंधरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शपथ घेतली.यावेळी पाण्याचा अपव्यय होणाऱ्या सर्व सवयी टाळेन व मी पाण्याचा कमी वापर करेन,मी माझ्या घरगुती कचऱ्याचे कोरड्या आणि ओल्या कचऱ्याच्या स्वरूपात वर्गीकरण करेन,मी ई-कचऱ्याची तसेच इतर घातक साहित्याची जबाबदारीने विल्हेवाट लागेल,मी हरित महोत्सव साजरे करेन,मी हरित भेटवस्तू पर्यायाची निवड करेन,मी स्थानिक पानपटे व वने यांची काळजी घेण्यास मदत करेन,मी माझ्या विशेष प्रसंगी किमान पाच झाडे लावेल,मी प्रवास करताना परत वाहतुकीचे निवड करेन तसेच मी एकदा वापरणे योग्य प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करणार नाही.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुनील चतुर्वेदी प्राचार्य वैनगंगा फिजिकल एज्युकेशन साकोली उपस्थित होते. पुष्पराज झोडे प्राचार्य टेक्निकल इन्स्टिट्यूट साकोली,डॅा.जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनात पर्यावरणाचे संगोपन केल्याने आरोग्य व्यवस्थित राहील, सुद्ध हवा , पाणी व त्याचबरोबर झाडांचे संगोपन केल्यास फळे, फुले, सावली मिळेल असे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य घनश्याम निखाडे यांनी प्रत्येकाने आपल्या जन्मदिवस साजरा करताना कमीत कमी पाच झाडे लावावे. सोबत त्या झाडांचे संगोपन करावे. कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल किंव्हा कोणतेही शुभ कार्य असेल त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावावे व झाडे लावून त्यांचे संगोपन करावे त्यामुळे पर्यावरण व्यवस्थित राहील व आपले आरोग्य सुद्धा सुदृढ राहील. सोबतच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आपल्या मार्गदर्शन सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबा चौधरी,विकास आगासे,सुहास वालदे,शैलेश फुंडे,आतिश भोवते,मुकेश पारधी,मिथुन प्रजापती,पुखराज लांजेवर,मंजुषा चूटे,विजया भागडकर,पायल टेंभुर्णीकर,शितल देशमुख, अजय गायधने,मुकेश भालावी,दिपक लबाडे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती कापगते यांनी केले.