‘त्या’ रात्री १० नाही तर ११ जणांचे जीव गेले

0
49
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीत प्रकरण
भंडारा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षात आग लागल्याची घटना ९ जानेवारीच्या रात्री घडली होती. या घटनेत १० नवजात बालकांचा बळी गेला. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. ही घटना फक्त आणि फक्त रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळेच घडली. परंतु, घटनेच्या १० बालकांचाच मृत्यु झाला नाही तर ११ जणांचे जीव गेले होते. यात १० नवजात बालके आणि एका महिलेचा समावेश आहे.
नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला आग लागल्यानंतर इतर रुग्णांच्या अतिदक्षता कक्षात भरती असलेल्या लाखांदुर तालुक्यातील पेंढरी (सोनेगाव) येथील अल्का दिनेश रोहनकर (३९) या विवाहितेला आवश्यकता            नसतांनाही नागपुरला हलविण्यात आले होते. त्याचा वाटेतच ऑक्सिजन अभावी मृत्यु झाला. सदर महिलेला निमोनीया झाला असल्याने कोरोना संशयीत म्हणुन आयसोलेशन वार्डात १४ डिसेंबर रोजी भरती करण्यात आले होते. दोनदा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयाच्या नेहमीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ९ जानेवारीच्या रात्री नवजात शिशुच्या अतिदक्षता कक्षाला आग लागल्यानंतर इतर रुग्णांच्या अतिदक्षता कक्षातील दोन रुग्णांना तातडीने नागपुर मेडीकलला रेफर करण्यात आले होते. यातील अल्का रोहनकर या रुग्णाचा ऑक्सिजन अभावी रस्त्यातच मृत्यु झाला. रुग्णालयात ऑक्सिजनचा मुबलक साठा असतांना आणि रुग्णालयात दुसरीकडे रुग्ण ठेवण्याची व्यवस्था असतांनाही सदर रुग्णाला नागपुरला का? हलविण्यात आले. असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नवजात शिशुंच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीचा परिणाम दुसर्‍या कक्षातील रुग्णांवर झाला कि, नाही ? याची साधी चौकशी करण्याची आवश्यकता मंत्री महोदयांना व नेतेमंडळींना वाटली नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सदर महिलेचा मृत्यु ऑक्सिजन अभावी झाला असला तरी हा मृत्यु रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा महिलेचे पती दिनेश रोहनकर व            कुटुंबियांनी केला आहे. सदर महिलेल्याच्या मृत्युबाबतची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सुद्धा देण्यात आली आहे. सदर महिलेला दोन अल्पवयीन मुले असुन ती मायेविना पोरकी झाली आहेत. सदर महिलेच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागण्ी माझी जि.प. सदस्या शुद्धमता नंदागवळी यांनी केली आहे.