गोंदिया : अयोध्येतील पावन भूमीवर प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारणार असून हे राष्ट्र मंदिर असणार आहे. यासाठी समाजातील प्रत्येकाने आपला हातभार लावणे गरजेचे आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन महाअभियानाच्या शुभारंभ प्रसंगी निधी संकलन कार्यालयात 15 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी नगराचे प्रथम नागरिक न. प. अध्यक्ष अशोक इंगळे, समाजसेवी हुकुमचंद अग्रवाल, बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, विहिपचे जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा, निधी संकलन अभियानाचे जिल्हा संयोजक सचिन चौरसिया उपस्थित होते. निधी संकलनासाठी नगरात निघालेल्या समितीला प्रथम समर्पण शहराचे युवा उद्योगपती रोशन जायस्वाल यांनी दिला. त्यांनी एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश पं. शैलेश महाराज व उपस्थित मान्यवरांना सोपवून शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी भिकम शर्मा यांनी एक लक्ष, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी 51 हजार व इतर सहा मान्यवर दानदात्यांनी प्रत्येकी 21 हजाराचे धनादेश समितीला सोपविले. या वेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.