गोंदिया,दि.१६:-काटी येथील स्थानीय सुकन्या संकल्प निकेतन माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय व महात्मा ज्योतिबा फुले कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काटीचे संस्थापक व संचालक गजेंद्रजी फुंडे यांचा वाढदिवस विद्यालयात आनंदात साजरा केला गेला.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यालयाचे शिक्षक मा.श्री ए.एम.सेलूकर द्वारा कार्यक्रमाची प्रस्तावना प्रस्तुत केली. त्याच प्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य श्री डी.एस.बहेकार यांची मा.फुंडे साहेबाच्या कार्याचे गुणगान केले तसेच बी.सी.बोपचे , एम.पी.रहांगडाले , एस.डब्लू.राऊत , एम.एन.असाटी व सर्व शिक्षकांनी त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकून त्यांच्या दिर्घआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मा.फुंडेजी यांची धर्मपत्नी सु.श्री.मंजुषाताई फुंडे यांच्या द्वारे विद्यार्थीसाठी ई-लर्निंग व ई-लायब्रेरी चा लाभ मिळण्यासाठी 50 इंची चा एंडयाईड एल.सी.डी. T.V. विद्यालयात भेट दिली .
कार्यक्रमाचा शेवट केक कापून वाढदिवस साजरा केला. विद्यार्थिनी त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी खुप शुभेच्छा दिल्या. विद्यार्थीना अल्पोहर देवून कार्यक्रमाचा शेवट केला गेला.