भंडारा दि. 22 : जिल्ह्यात आज 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12509 झाली असून आज 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13077 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.66 टक्के आहे.आज 507 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 15 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 14 हजार 533 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13077 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 08, मोहाडी 01, तुमसर 03, पवनी 01, लाखनी 01, साकोली 01 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 12509 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13077 झाली असून 248 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 01 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 320 झाली आहे. रु बरे होण्याचे प्रमाण 95.66 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.45 टक्के एवढा आहे.
चंद्रपूरः-जिल्ह्यात मागील 24 तासात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 23 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 928 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 353 झाली आहे. सध्या 192 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 92 हजार 495 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 67 हजार 182 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 383 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 347, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 13, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.