प्रोग्रेसिव्ह मराठी शाळेत ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा

0
27

गोंदिया–श्रीमती उमादेवी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह मराठी शाळेत ज्ञानपीठ विजेता कवीवर्य कुसुमाग्रज यांची १0२ वी जयंती मराठी भाषा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती माता व कवी कुसुमाग्रज यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार व संस्था सचिव डॉ. निरज कटकवार उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांद्वारे कवी कुसमाग्रज द्वारे रचित कवितांचे गायन करण्यात आले. या दरम्यान उपस्थित मान्यवरांनी कवी कुसुमाग्रज यांच्या जिवनाबद्दल विद्यार्थ्यांना अवगत करून दिले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, मिनाक्षी माहापात्रा, विना कावडे, निधी व्यास, कृष्ण चौहान, अभय गुरव, विकास पटले, तुमेश पारधी, राहूल रामटेके, दिव्यांशु जायस्वाल यांनी अथक प्रयास केले. तसेच आभार प्रदर्शन मराठी शिक्षिका सुशिला भोयर यांनी केले.