गोंदिया-मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतील विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तालुका कृषि अधिकारी गोंदियामार्फत पोलिस कर्मचारी वसाहत कारंजा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परवानगीने १३ मार्च २0२१ पासून सुरुवात करण्यात आला.
गोंदिया तालुक्यात धानाव्यतिरिक्त भाजीपाला उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत तालुक्यातील शेतकरी गटामार्फत व भाजीपाला उत्पादक शेतकर्यांमार्फत ताजा व दजेर्दार भाजीपाला विक्री शनिवारपासून पोलीस वसाहत कारंजा येथे सुरु करण्यात आली. काटी, बिरसोला, वडेगाव, अदासी, गुदमा, तांडा, एकोडी, लोधीटोला येथील शेतकर्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला, पपई, सेंद्रीय गुळ, लाकडी तेलघाणीवर काढलेले जवस व सरसो तेल विक्रीकरीता ठेवले होते. पोलीस कर्मचारी वसाहतील ग्राहकांनी या बाजारातील शेतमाल खरेदी करुन उत्तम प्रतिसाद दिला.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनिल खडसे यांनी सहभागी शेतक?्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करुन बाजाराच्या आयोजनामागील शासनाचा हेतू सांगितला व शेतकर्यांना दजेर्दार शेतमाल दर शनिवारला विक्रीकरीता आणण्याची विनंती केली. सहभागी शेतकरी गटांना सावलीसाठी छत्री तसेच बॅनर, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा आत्मा विभागामार्फत पुरविण्यात आल्या.
रयत बाजार आयोजनासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन यांनी पर्शिम घेतले. सदर बाजार हा दर शनिवारला पोलीस कर्मचारी वसाहत कारंजा येथे दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपयर्ंत भरविण्यात येईल असे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे