जागतिक क्षयरोग दिन साजरा

0
36

गोंदिया,दि.24 : 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रॉबर्ट कॉक या
शास्त्रज्ञांनी 24 मार्च 1882 मध्ये मायक्रोबॅक्टेरीअम ट्युबरक्युलोसीस या जिवाणुचा शोध लावला. म्हणून 24 मार्च
हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे.
भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन 1962 पासून प्रास्थापित जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य
केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये राबविला जात आहे.
जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी अंतर्गत 24 मार्च 2021 रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमाचा
शुभारंभ दीपप्रज्वलन करुन डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर क्षयरोग जनजागृती
कार्यक्रम तसेच फ्लेक्स डिस्पले करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,
तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे उपस्थित होते.
यावेळी डॉ.मोहबे यांनी प्रत्येक क्षयरुग्णाला क्षयमुक्त करण्यात यावे असे मार्गदर्शन केले. डॉ.कापसे यांनी
आपल्या मार्गदर्शनातून 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कठोर
परिश्रम घेण्यात यावे असे सांगितले. यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व शाल-
श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.आर.जे.पराडकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक धनेंद्र कटरे, जिल्हा
डॉटस् प्लस टी.बी.एय.आय.व्ही. पर्यवेक्षक सी.बी.भुजाडे, जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे, वरिष्ठ उपचार
पर्यवेक्षक हरीष चिंधालोरे, डी.सी.डोंगरवार, पंकज लुतडे, श्री हटवार, श्री अग्रवाल, प्राजक्ता कुथे, श्री भोयर,
एच.एस.उईके, ज्योती आगाशे, माया बघेले, कु.बघेले, श्री चुन्ने, वाय.पी.अडसड, सुनिल गावडकर, सौ.पांडे, श्री
कुंभलकर व निरज मरमट उपस्थित होते.