100 दात्यांची रक्तदानाने शहिदांना श्रद्धांजली

0
24

अर्जुनी मोरगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात हसतहसत हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद वीर भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या 90 व्या शहीद दिनानिमित्त अर्जुनी मोरगाव येथे इंटरनॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्था अध्यक्ष लुनकरण चितलंगे यांचे हस्ते झाले. या वेळी डॉ.कैलास गाडेकर, डॉ.गजानन डोंगरवार, डॉ.श्रीकांत नाकाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वीर शहिदांना श्रद्धांजली आणि भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमापूज, दीपप्रज्वलनाने झाली. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील तब्बल 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तालुक्यातील हे सर्वात मोठे रक्तदान शिबिर ठरले. रक्तदात्यांना आयोजकांनी प्रशस्तीपत्र, मास्क आणि सॅनिटाइझर भेट दिले. शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालय गोंदिया येथील रक्तपेढीचे डॉ.चव्हाण, अनिल गोंडाने आणि चमूने रक्त संकलनाचे कार्य केले.