Home विदर्भ ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता भाजपा कार्यकर्ते मुंबईला रवाना

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता भाजपा कार्यकर्ते मुंबईला रवाना

0

गोंदिया,दि.१०-मुंबई येथील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या विशेष उपस्थितीत रविवारी ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा बीकेसी ग्राउंड बांद्रा येथे आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता गोंदिया जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती आघाडीचे शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते आज १० ऑक्टोबर रोजी हावडा-कुर्ला एक्सप्रेसने मुंबईला रवाना झाले.
या ऐतिहासिक समारंभात सहभागी होण्याकरिता भाजपा गोंदिया जिल्हातर्फे दोन विशेष कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रसंगी रेल्वे स्थानकावर भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, भाउराव उके, प्रचार प्रसिद्घी प्रमुख जयंत शुक्ला, प्रदिपqसह ठाकूर, महेश आहुजा, जि. प. सदस्य विश्वजित डोंगरे, शहर महामंत्री संजय मुरकुटे, धनंजय वैद्य, पंकज सोनवाने, अहमद मणियार, रोहित अग्रवाल, पुष्पराज जनबंधू, मोहन गौतम, मंगलेश गिरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version