आज 69 नवीन कोरोना बाधित तर 34 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.26: आज जिल्हयात 69 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10397 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9862 वर पोहचली. तसेच सद्या 426 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.85 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.10 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.नवीन 69 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 43, अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी 3, धानोरा तालुक्यातील 1, एटापल्ली 1, कुरखेडा 3, सिरोंचा 1, तर वडसा तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 34 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 19, अहेरी 1, आरमोरी 6, चामोर्शी 1, धानोरा 1,कोरची 3, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 1, रामपूरी वार्ड 5, गुरुकानगर गोंडवाना विद्यापीठ जवळ 1, बुध्दविहार नवेगांव कॉम्पलेक्स 4, कन्नमवार वार्ड 5, लिटील फ्लॉवर शाळा वसा 2, नवेगांव 4, जेप्रा 1, इंदाळा 1, गोकुलनगर 1, गांधीवार्ड 2, आशिर्वाद नगर 4, स्थानिक 1, एसआरपीएफ कॅम्प 2, जिल्हा परिषद कॉलनी 1, सर्वोदय वार्ड 1, रामनगर 1, गणेशनगर 1, रामनगर 1, कोटगल 1, कॅम्प एरिया 1, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली 2, वडेगांव 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये राजेंद्र वार्ड 1, वीरर्सी वार्ड 1, स्थानिक 1, कस्तुरबा वार्ड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 2 , आलापल्ली 4, स्थानिक 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये बेजू 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, वैरागड 2, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 2,चौधमपल्ली 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये मोयाबिनपेठा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.
भंडारा, दि.26 :- जिल्ह्यात आज 83 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14152 झाली असून आज 285 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16150 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.62 टक्के आहे.आज 2203 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 285 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 69 हजार 672 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 16150 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 118, मोहाडी 17, तुमसर 47, पवनी 42, लाखनी 38, साकोली 20 व लाखांदुर तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 14152 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 16150 झाली असून 1664 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 334 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.62 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.06 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.