बालिकेच्या पालकांना भेटण्याचे आवाहन

0
145

गोंदिया,दि.26 : दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी अंदाजे वय 6 वर्षे ग्राम नागरा (ता.गोंदिया) येथे स्त्री
जातीची बालिका आढळून आलेली असता पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गोंदिया (ग्रामीण) येथे सदर बालिकेची
तक्रार नोंद करण्यात आली असून 1 मार्च 2021 रोजी पोलीस स्टेशन गोंदिया (ग्रामीण) यांनी सदर बालिकेला बाल
कल्याण समिती गोंदिया यांचे समक्ष सादर केले असता, बाल कल्याण समिती गोंदिया यांचे आदेशानुसार सदर
बालिकेला बाल उदय शिशु गृह भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर बालिकेचे जैविक माता-पिता, नातेवाईक यांनी बातमी प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसाच्या आत
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, द्वारा- जिल्ळा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नविन प्रशासकीय
इमारत, तिसरा माळा, खोली क्र.36, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे मो.9405985349, 8007148542 यावर संपर्क
साधावा. जर दिलेल्या तारखेस संपर्क साधला नाही तर केंद्रीय दत्तक प्राधिकरण, नवी दिल्ली यांचेद्वारा दत्तक
प्रक्रियेकरीता सदर बालिका विधी मुक्त करण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी कळविले आहे.