साकोली:शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात व देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यापासून आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेप्रमाणे साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून एक दिवशीय उपोषण करण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, असंघटित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मार्तंडराव भेंडारकर, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष छायाताई पटले, स्नेहा रंगारी, विजय कापगते, हरगोविंद भेंडारकर, डॉ. अशोक कापगते, लीलाधर पटले, चरण मेश्राम, दिना बडवाईक, निर्मला कापगते, माजी सभापती रेखाताई वासनिक, नेपाल कापगते, उमेश भेंडारकर राजू निवारे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाची सांगता मा. तहसीलदार यांच्यामार्फत केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे तात्काळ मागे घेण्याकरिता महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.