लसीकरण मिशन मोडवर राबवा – विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

0
24

नागपूर दि. 28 :-  कोविड लसी विना कोणीही वंचित राहणार नाहीयाची खबरदारी घेवून जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या. 60 वर्षावरील वयोवृध्द नागरिक व 45 वर्षावरील विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना कोव्हक्सीन व कोव्हिशिल्ड लस जिल्ह्यात सर्वत्र देण्यात येत आहे. या लसीकरण  केंद्राला त्यांनी आज भेट देवून पाहणी केलीत्यावेळी ते बोलत होते.

हिंगणा तालुक्यातील बुटीबोरी,  गुमगाव आयुर्वेदिक दवाखानावाडी, कामठी तालुक्ययातील कोराडी येथील कोविड लसीकरण केंद्राची पाहणी  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरउपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरीहिंगण्याचे तहसीलदारपंचायत समितीचे गटविकास अधिकारीतालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून मास्कसॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अत्यंत आवश्यक आहेअसे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. त्याबरोबरच जिल्ह्यात 125 कोविड लसीकरण केंद्र असून  लाख 50 हजाराचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यासाठी डाटा एंट्रीच्या संख्येने वाढ करणे गरजेचे आहे. त्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. तसेच एप्रिलपर्यंत सर्व लसीकरण पूर्ण करावयाचे असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्टय समोर ठेवून मिशन मोडवर काम करावेअशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

ही मोहीम राबवितांना पथकाने ग्रामीण भागात घरोघरी जावून त्यांची डाटा एंट्री करावी व ही प्रक्रिया सुलभतेने हाताळण्याच्या सूचनाही त्यांनी  दिल्या. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या मनात असलेली लसीकरणाबाबतची भिती काढण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करुन सहकार्य करावे. जेणेकरुन कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करणे शक्य होईलअसे त्यांनी सांगितले.

या लसीकरण मोहिमेदरम्यान ग्रामीण भागातील जिल्हा परिषद सदस्यपंचायत समिती सदस्य तसेच  सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी  व गावातील लस घेणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोहिमेअंतर्गत 1 लाख 41 हजार 878 असे एकूण 33 टक्के लसीकरण करण्यात आले असून तालुकानिहाय लसीकरण भिवापूर- 6 हजार 359, हिंगणा- 21 हजार 185, कळमेश्वर- 9 हजार 298, कामठी- 12 हजार 345, काटोल- 11 हजार 321, कुही- 6 हजार 829, मौदा- 7 हजार 496, नागपूर- 12 हजार 558, नरखेड- 8 हजार 652, पारशिवनी- 8 हजार 495, रामटेक- 9 हजार 139, सावनेर- 15 हजार 540, उमरेड- 12 हजार 661 असे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरातही लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह असून नागरिकाचा सहभाग अधिक वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.