पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते शहिदाच्या कुटुंबियांना धनादेशाचे वितरण

0
38
????????????????????????????????????

बुलडाणा,दि.01 : जिल्ह्यातील शहीद जवान प्रदीप साहेबराव मांदळे (युनिट 10 महार रेजिमेंट) रा. पळसखेड चक्का, पो सावखेड तेजन ता. सिं. राजा  हे देशातंर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन रक्षक मोहिमे अंतर्गत नियंत्रण रेषेजवळ द्रास सेक्टर येथील ऑपरेशन एरियामध्ये हिमस्खलनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे 15 डिसेंबर 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्या वतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,  सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या कुटुंबियांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती कांचन प्रदीप मांदळे, वीरमाता श्रीमती सुनंदा साहेबराव मांदळे यांना 40 लक्ष  रूपयांचा धनादेश देण्यात आला.