साडे पाच फुटाच्या नागाला जीवदान

0
37

अर्जुनी मोरगाव,दि.01ः-येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहती मध्ये बुधवार (31) ला सायंकाळी साडे चार वाजता दरम्यान साप दिसून आला.माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली.ही माहिती सर्पमित्र राहुल लाडे, मुकेश पवार यांना देण्यात आली.सर्पमित्रांनी सदर सापाला ताब्यात घेतले.हा साप नाग प्रजातीचा साडे पाच फूट लांबीचा आणि अतिविषारी असल्याची माहिती सर्प मित्र राहुल लाडे यांनी दिली.या सापाला सोनेगाव जंगल शिवारात सोडण्यात आले.