ग्रामसेवक संघटना व सरपंच महासंघ अमोरासमोर

0
82

गोरेगाव--पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत कुर्‍हाडी ग्रामपंचायत चे ग्रा.वि.अधिकारी शिवकुमार रहांगडाले यांच्या आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोट ने वेगळे वळण घेतले असून सरपंच व ग्रामसेवक संघटना अमोरासमोर ठाकल्या आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करुन आत्महत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. १ एप्रिल ला सरपंच संघटनेने पं.स.च्या खंडविकास अधिकारी टेंभरे यांना गाठून निवेदन दिले. त्या निवेदनात कलम ३९ लावून सरपंचाला पदमुक्त करण्याची ग्रामसेवक संघटनेची मागणी ही सरपंचांना अपमान देणारी आहे. ग्राम विकास अधिकार्‍याची बदली होऊन आठ महीने झाले तरीही त्यांना रीलिव्ह का करण्यात आले नाही. सरपंच पतीपासून त्रास होता तर संघटनेला वा प्रशासनाला तक्रार का केली नाही. ३0मार्च ला ग्रामसेवकांनी सुट्टी घेतली काय, असे अनेक प्रश्न सरपंच संघटनेने उपस्थित करून चौकशीचा अहवाल मागितला आहे. शिवकुमार रहांगडाले यांनी कार्य केलेल्या चारही ग्रामपंचायतची चौकशी करण्याचे आदेश बी.डी.ओ. टेंभरे यांनी ग्रामविस्तार अधिकारी पं.स.सिंगणजुडे यांना दिले आहे. या प्रकाराची दखल घेत तडकाफडकी डी.वाय.एस.पी. नालकुल पोलीस ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित झाले व प्रकरणाला शांत केले.