
नगरपरीषदने जवळपास पन्नास जणांना बजावली नोटीस :
नगर विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ३२ म्हणुन आरक्षित
देसाईगंज दि. ३१-नगर विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ३२ अशी नोंदण असलेल्या आठवडी बाजारासाठी आरक्षित जागेवर अनाधिकृत पक्का बांधकाम करणाय्रा जवळपास पन्नास जणांना केलेला अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषद देसाईगंजच्या नगर विकास विभागाने नोटीस बजावल्याने बाजारपेठत एकच खळबळ माजली आहे.
सध्या कोरोणा विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन असुन स्थानिक प्रशासन कोरोणा विषाणुचा संसर्ग नियंत्रित ठेवण्यात व्यस्त आहे. याचाच गैर फायदा घेत आठवडी बाजारातील अतिक्रमणधारक अतिक्रमित जागेवर विना परवानगी अनाधिकृत पक्का बांधकाम करण्याचा सपाटा चालविला आहे. ज्या ठिकाणी अनाधिकृत पक्का बांधकाम सुरु केलेला आहे, ती जागा देसाईगंज शहराच्या आठवडी बाजारासाठी नगर विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ३२ म्हणुन आरक्षित करण्यात आली आहे.
त्यामुळे देसाईगंज शहराच्या आठवडी बाजार( गुजरी) मध्ये नगर परिषदेची कोणती ही परवानगी न घेता अनाधिकृत अवैद्य पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केल्याची नगर परिषद कार्यालयाचे निदर्शनास आले आहे. अवैद्यरित्या केलेले अतिक्रमण सदरचे नोटीस प्राप्त झाल्याचे तीन दिवसाच्या आत स्वखर्चाने काढुन टाकावे, अन्यथा महाराष्ट्र महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औधोगीक नगर अधिनियम १९६५ चे कलम १७९ अन्वये कार्यवाही करुन नगरपरीषद यंत्रणेद्वारे अतिक्रमण काढण्यात येईल व या संबंधीचा येणारा खर्च अतिक्रमण धारकांकडुन सक्तीने वसुल करण्यात येईल अशी नोटीस कावी/नपदे/नवि/२९३/२०२१ अन्वये दि १९/०५/२०२१ ला बजावलेली आहे. नोटीस बजावुन दहा दिवसांचा कालावधी उलटुनही नगर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमण अद्यापही काढलेला नसल्याने अतिक्रमण काढणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार संकुल प्रस्ताव थंडबस्त्यात
देसाईगंज शहर नगर विकास आराखड्यात आठवडी बाजार करिता आरक्षण क्रमांक ३२ या आरक्षित जागेवर एकात्मिक शहर विकास अंतर्गत ७५ गाळे बांधकामासाठी ६३ लाख १४ हजार ३२० रुपये बाजार संकुल बांधकामासाठी मंजूर झाले होते, परंतु या ठिकाणी सभोवताल मोठ्या प्रमाणात अनाधिकृत अतिक्रमण असल्याने बाजार संकुल प्रस्ताव अद्यापही प्रलंबीतच आहे.