बुलडाणा 113,भंडारा 83,वाशिम ११४,चंद्रपूर 179,गोंदिया 52 नवीन कोरोना रुग्ण

0
63
गोंदिया,दि.31 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 31 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.87 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 1
रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आजपर्यंत 40,717 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 39,690 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 338 आहे.190 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 689 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.48टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.61 टक्के आहे

भंडारा, दि.31:- जिल्ह्यात आज 84 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 56755 झाली असून आज 83 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 58765 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्के आहे.आज 469 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 83 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 86 हजार 354 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 58765 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 03, मोहाडी 00, तुमसर 01, पवनी 03,  लाखनी 12, साकोली 63 व लाखांदुर तालुक्यातील 01 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 56755 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 58765 झाली असून 956 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 01 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1054 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.79 टक्के एवढा आहे.शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित; २७२ जणांना डिस्चार्ज-

जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तसेच आरोग्य विभागाने २४ मे रोजी स्पष्ट केल्यानुसार जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसांत झालेल्या मृत्यूंची माहिती पोर्टलवर अपडेट करण्याची कार्यवाही सातत्याने सुरु असून त्यानुसार पोर्टलवर अपडेट झालेल्या १२० मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.कोरोना बाधितांची सद्यस्थिती- एकूण पॉझिटिव्ह – ४००६३,ऍक्टिव्ह – २१५८,डिस्चार्ज – ३७३२६,मृत्यू – ५७८

बुलडाणा जिल्ह्यात-आज पॉझिटिव्ह : 113,एकूण पॉझिटिव्ह : 84778,मृत्यू : 606,आतापर्यंत डिस्चार्ज :82343,आजचे डिस्चार्ज : 901

चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह : १७९,एकूण पॉझिटिव्ह : ८२,७८४,एकूण मृत्यू : १,४४७,एकूण डिस्चार्ज…,७८,७३९
आज डिस्चार्ज : ५५३