अर्जुनी मोरगाव येथे “कोविड योद्धांचा सन्मान”

0
24

अर्जुनी-मोरगाव, दि.31 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारच्या सात वर्षाच्या यशस्वी कार्यपूर्तीनिमित्त भाजप पक्षाच्यावतीने अर्जुनी-मोरगाव मतदार संघातील नवेगावबांध, खोबा, कोकणा, मुंडीपार, पळसगाव-राका येथे “कोविड योद्धा सन्मान” समारंभ पार पडला.
कोरोनाच्या अतिशय कठीण काळात सामाजिक बांधिलकी या नात्याने कोविड योद्ध्यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ कोरोना काळात जनतेची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांचा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.कोविड संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना योद्ध्यांचे योगदान मोठे असून स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता ही लढाई न डगमगता ते लढत आहेत, असे बोलून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सर्वांचे आभार यावेळी व्यक्त केले.
सत्कार करताना प्रदेश सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, माजी सभापती गिरीधारी हत्तीमारे, कविता रंगारी, शिला भेंडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजया कापगते, रघुनाथ लांजेवार, खुशाल काशिवार, होमराज पुस्तोडे, अण्णा पाटील डोंगरवार, लक्ष्मीकांत धानगाये, सुमेंद्र धमगाये, खेमराज भेंडारकर, अशोक कापगते, पराग कापगते, डिलेश सोनटक्के यांच्यासह सर्व भाजपचे पदाधिकारी, संरपच, आरोग्य अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

रमेश मस्के यांच्या नेतृत्वात घरोघरी जावून कोरोना योद्ध्यांचा सत्कार

तालुका भाजपाचे माहुरकुडा पं.स. प्रमुख रमेश मस्के यांच्या नेतृत्वात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विविध गावातील आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा त्यांच्या घरी जावून कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
सध्या कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचे कर्मचारी सतत काम करीत असतात. अन्य विभागापेक्षा आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा कोरोना रुग्णांशी व त्यांच्या कुटुंबांशी सतत संपर्क असतो. ते छोटे कर्मचारी असल्याने दुर्लक्षित असतात, हिच नेमकी संधी साधून केंद्र सरकारच्या सात वर्षापूर्तीनिमित्त तालुका भाजपाच्यावतीने गावखेड्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांचा कोरोना योद्धा म्हणून घरोघरी जावून सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती आरोग्य कर्मचा-यांमध्ये अर्जुनी-मोरगावच्या आरोग्य सेविका नेवारे, उज्वला खोब्रागडे, माहुरकुडाच्या आरोग्य सेविका शेंडे, नूतन कोडापे, सिरोली आरोग्य सेविका प्रतिभा डोंगरे, मालकनपूरच्या आरोग्य सेविका रेखा पाटनकर, निलजच्या आरोग्य सेविका संघमित्रा मेश्राम, तावसीच्या आरोग्य सेविका कविता शहारे, महालगावच्या आरोग्य सेविका पूजा रामटेके यांचा समावेश आहे.
या वेळी भाजपाचे माहुरकुडा पं.स. प्रमुख रमेश मस्के, अनुसूचित जाती महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव मिना शहारे, सिरोलीच्या उपसरपंच सुनिता मस्के, नरेश खंडाईत, सोनू क-हाडे, प्रभू कुंभांरे, लाला कापगते प्रामुख्याने उपस्थित होते.