धनगर समाज संघर्ष समिती कडून धामणगाव गढी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

0
23

अचलपूर:– संस्थापक अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती पद्मश्री खासदार डॉ,विकासजी महात्मे यांच्या कडून सर्व कार्यकर्त्यांना व समाज बांधवांना आवाहन करण्यात आले होते,कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे, हेच विचार लक्षात घेता कोणीही गर्दी होईल असे आयोजन करू नये सद्या स्थिती पाहता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र यांना ग्रामीण भागात अँबुलन्स करता एकच ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होते, व ग्रामीण भागातील रुग्णाच्या आरोग्याची काळजी  बघता त्यांच्या सेवेकरता    आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री खासदार डॉ,विकासजी महात्मे यांच्या  नेतृत्वाखाली,व मा,संतोषजी महात्मे यांच्या सहकार्यातुन आज प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव गढी यांना पल्स ऑक्सीमीटर व ऑक्सिजन सिलेंडर चे वाटप धनगर समाज संघर्ष समिती चे मा,अक्षय कात्रे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वाटप करण्यात आले,कार्यक्रमाला उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ,पूनम मोहोकार, आरोग्य कर्मचारी वर्ग, आमचे सहकारी डॉ,सुरज कात्रे(पशुसंवर्धन) सागर तायडे रुग्णसेवक आरोग्य केंद्र धा,गढी   व  धनगर समाज संघर्ष समिती चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा भेट देऊन रुग्णालयात पाहणी केली, गरज पडल्यास ऑक्सीजन चा व इतर साहित्याच्या पुरवठा वेळोवेळी करण्यात येईल असे आश्वासीत केले,