
# टाळे महिला अस्वथ
# एका ट्विट ने जागे झाले रेल्वे प्रशासन
आमगाव :– ‘आपली रेल्वे ‘नावाने नावाजलेली भारतीय रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरवत असल्याचे गाजावाजा करते तीच रेल्वे सेवा आज ताळेबंद सेवा पुरवीत असल्याचे चित्र समोर आले आहे.प्रवाशी गाड्यामधील महिलांसाठी राखीव कोचमधील बाथरूम टाळे ठोकून त्यांचे उत्तपीडन करीत आहे.
१जून ला दुर्ग गोंदिया इतवारी प्रवाशी रेल्वे गाडी सकाळी धावली त्यावेळेस गाडी मधील महिला राखीव कोच मधील महिलांसाठी उपलब्ध बाथरूम हे टाळे ठोकून बंद असल्याचे निदर्शनास आले.
डोंगरगड गोंदिया गाडी क्रमांक ०८७४१ ,गोंदिया इतवारी ०८७४३प्रवाशी लोकल गाडीमधील महिला डब्ब्यात महिलांसाठी उपलब्ध बाथरूम ताळेठोकून बंद असल्यामुळे महिलांना अनेक असुविधांचा सामना करावा लागला.
रेल्वेत प्रवास करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते . रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यामध्ये प्रवाश्यांना वासरूमची सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सामान्य प्रवासी तर व्याधी असलेली महिला यांना या वासरूम मुळे स्वताला सावरता येत असे, परंतु याच उपलब्ध कोच मधील बाथरूम रेल्वे प्रशासनाने टाळे ठोकून बंद केल्यामुळे महिला प्रवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. आमगाव रेल्वे स्थानक वरून अनेक महिला या गाडीतील बाथरूम वापरण्यासाठी बघितले त्यावेळी ते बोथरूम ताळेबंद असल्याचे निदर्शनास आले. अनेक महिलांनी याबद्दल रोष व्यक्त करीत आपली व्यथा सांगितले. याची दखल घेत सोसियल वर्कर यशवंत मानकर यांनी उपलब्ध बाथरूमची फोटो क्लिप काढून सरळ केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना ट्विट करून तात्काळ कारवाई करण्यासाठी मागणी केली.
या ट्विटचे लगेच दखल घेत भारतीय रेल्वे सेवा विभागाने संबंधित विभागांना सूचना दिल्या व कार्यवाहीचे आस्वासनाचे ट्वीट व मोबाईल वर संवाद साधून उत्तर दिले.