
# बांधकाम विभाग अकार्यक्षम
#नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आमगाव:-आमगाव परिक्षेत्रात राष्ट्रीय राज्य महामार्गवर रस्ते विकास कामे सुरू करण्यात आले आहे.परंतु बांधकामात उडणाऱ्या धुळीमुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राष्ट्रीय राज्य महामार्गावर सिमेंट रस्ता बांधकाम सुरू झाले आहे. बांधकामात पूर्व रस्त्याचे खोदकाम करून मातीचे ढिगारे उपसा करून अन्य ठिकाणी वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे देवरी ते आमगाव,
आमगाव ते लांजी मार्गावर बांधकाम करताना उडणारी धूळ तर रस्त्यावर पडलेली ढिगारेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. लोकवस्ती मधील लोकांना उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचा आजाराला बळी पडावे लागत आहे.
रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राट कंपनी शिवालय काँट्रॅकशन कंपनी व पटेल काँट्रॅकशन कंपनी तर्फे सदर बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकाम पूर्वीच संथ गतीने सुरू असून दैनंदिन वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यात कंपनी द्वारे बांधकामं करण्यात येणाऱ्या साहित्यात अनियमितपणा होत असल्याचे उघड आहे. तर रस्त्यावर साचलेले ढिगारे व उडणाऱ्या धुळीवर पाणी मारून धूळवडी वर काही प्रमाणात उपाय करणे आवश्यक असताना बांधकाम कंपनी आपल्या अकार्यक्षमपणा पुढे करीत आहे.
रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना कोविड आजाराला टाळण्यासाठी स्वस्थ राहण्याचे कानमंत्र ,तर कायदा करून घरीच थांबण्याची ताकीद देण्यात येत आहे, तर दुसरीकडे घरी बसलेल्या नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. अनेकांना श्वसनाचा आजाराने ग्रासले आहे.स्थानिक प्रशासनाने बांधकाम कंपनी विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.