अभियंता रामटेक्करच्या पुढाकाराने निराधार मानसिक रुग्ण्‍ा महिलेस मिळाला शासकीय आसरा

0
71

गोंदिया : शहराच्या रेलटोली क्षेत्रात वेळसर स्थितीत फिरत असलेल्या 30 वर्षीय मानसिक रुग्ण्‍ा महिलेस स्थानिक अभियंता वासुदेव रामटेक्कर नी घेतलेल्या पुढाकारामुळे काल दि. 1 जून ला पोलिस संरक्षणात मनोरुग्णालय नागपुरला उपचाराकरिता पाठविण्यात आले. श्री रामटेक्कर हे सोमवारी दि. 31 मे ला संध्याकाळी रेलटोली क्षेत्रातून जात असतांना ही महिला काही असामाजिक तत्वांच्या तावड़ीत सापडलेल्या स्थितीत त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच गुजराती शाळे समोर चौकावर बंदोबस्त्‍ा ड्युटीवर असलेल्या महिला कांस्टेबल सुलोचना मेश्राम च्या सहायाने तिची सुटका करवून घेतली. विचारपूस केल्यावर तिने आपले नांव शीला धुर्वे, वडीलांचे नाव बिंदु परतेती व जिल्हयाचे नाव छिंदवाडा सांगितले. पण ह्या पुढे ती कोणतीच माहिती सांगु शकत नव्हती.

सबब श्री रामटेक्कर ह्यांनी जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाड़े ह्यांना घटनेशी अवगत करुन त्याच्या सह रामनगर पोलिस स्टेशन मधे जाऊन लिखित तक्रार नोंदविली. पोलिस विभाग मार्फत सदर प्रकरणाची लगेच दखल घेऊन ह्या वेड़सर महिलेला के.टी.एस. हॉस्पीटल मधे दाखल करुन वैद्यकीय परीक्षण प्रक्रीया पार पाडली. तसेच स्थानिक न्यायालय कडून पोलिस कांस्टेबल राजेश सोनवाने, शारदा मौर्या, कुमुद येरणे व पोलिस चालक राधेश्याम कांबळे च्या संरक्षणात मानसिक रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्याल आले. ह्या सर्व प्रक्रियेत जिल्हा महिला कार्यालयाचे श्री. कपिल टेंभुर्णे, पोलिस कांस्टेबल सुनील बोरकर, महिला कांस्टेबल सोनाली परिहार व देशभ्रतार ने ही मोलाचे सहकार्य केले.

रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती सुधारल्यावर महिलेचे कुटुंबाचा पत्ता लाऊन परिवाराच्या स्वाधिन करण्यात येतो किंवा पत्ता न लागल्यास महिला आश्रममधे दाखल करण्यात येतो.श्री रामटेक्करनी घेतलेल्या पुढाकारामुळे ह्या वेळसर महिलेची तिच्या असहाय स्थिती पासून सूटका मिळाली. ह्यापूर्वी ही त्यांनी विविध ठिकाणी फिरत असलेल्या 3 वेळसर महिलांना अश्याच प्रकार मदत केली आहे व इतर 2 महिलांचे कुटुंबीय शोधुन त्यांचे परिजनाचे सूपुर्द केले आहे.

कुठेही अश्या प्रकाराचे मानसिक रुग्ण्‍ा आढण्ल्यास त्यांचे दुर्लक्ष न करता संबंधित पोलिस स्टेशन व जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयास कळवून आपले सामाजिक दायित्व्‍ा पार पाडण्याचे निवेदन श्री वासुदेव रामटेक्क्‍र ह्यांनी नागरीकांना केले आहे.

ह्या प्रकरणास त्व्‍ारीत दखल घेऊन 24 तासाच्या आत पिडीत महिलेस पूर्ण सहाय्य्‍ा पुरविण्याबद्दल रामनगर पोलिस स्टेशनचे पी.आय. प्रमोद घोंगे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तुषार पौनीकरचे विशेष आभार त्यांनी व्य्‍ाक्त्‍ केले आहे.