रेती तस्करांचे मुसक्या आवळन्यासाठी जिल्हाधिकऱ्याना निवेदन

0
37

आमगाव: तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे दिवसेंदिवस रेती अवैध उत्खनन करून तेथील झाडांची कत्तल केली जात आहे. या विषासंदर्भात तहसीलदारयांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ग्राम पंचायत मुंडीपार येथे महसूल विभाग आमगाव, साजा सरकारटोला हदितील नदीपात्रातील रेती अवैध उपसा केली जात आहे. तसेच रस्ता ओलांडण्यासाठी वनविभागाची जागा असल्याने तेथील झाडांची नासाडी केली जात आहे.
तहसिल कार्यालयातील महसुल बुडत आहे व वनसपत्तीचे नुकसान होतअसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ग्राम मुंडीपार येथील रस्याची दयनिय अवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत व ट्रॅक्टर वाहतुकीमुळे कर्कश आवाजाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर घाटाचे आवंटन झाले नाही परंतु रेती उत्खनन करून गावात विक्री किंवा साठवणूक केली जात आहे जेणे करून पावसाळ्यात दुपट्ट भावांनी विक्री केली जाते.वाहचालक पहाटे ४ वाजे पासून तर दिवसभर रेतीची वाहतूक करतात.
दोषींवर कठोर कारवाही करण्याची मागणी लक्ष्मण उईक, सुनील कुंभरे, रामलाल वाढीवां, संतोष मडामे, पिरम मडामे, आदी गावकऱ्यांनी केली आहे.