
खा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाला यश;अन्न व नागरी पुरवठा विभागाचा निर्णय
गोंदिया –-रब्बी हंगामाचे धान खरेदीची परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर १९ मे च्या परिपत्रकाच्या माध्यमातून उघड्यावर धानखरेदी होणार नाही. याची दक्षता घ्यावी, असे कळविण्यात आले. यानुरूप अनेक केंद्रावरील धानखरेदी गोदामाअभावी रखडली होती. यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेवून अन्न व नागरी पुरवठा विभागाला शासकीय संस्थांच्या रिकाम्या इमारती अधिग्रहीत करण्यात यावे, असा सल्ला दिला होता. यानुरूप २ जून रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने परिपत्रक निर्गमित करून धानखरेदीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी धानखरेदी अपेक्षित आहे. तेथे शासकीय संस्थांच्या इमारती असल्यास त्या अधिग्रहीत करून धानखरेदी सुरू करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. यामुळे रखडलेल्या धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये धानाची खरेदी १ मे ते ३० जून हा कालावधी निश्चित करण्यात आला. यानुरूप १ मे पासून धानखरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्यात भरडाईसाठी धानाची उचल न झाल्याने गोदामात मोठ्या प्रमाणात धान पडून आहे. यामुळे रब्बी हंगामात खरेदी करण्यात येणार्या धानाची साठवणुक कुठे करावी? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने १९ मे रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या माध्यमातून उघड्यावर धानखरेदी होणार नाही, अशाही सुचना करण्यात आल्या होत्या. यामुळे जिल्ह्यातील अनेक केंद्रावर गोदामाअभावी धान खरेदी रखडली. एवढेच नव्हेतर अपेक्षित १ मे पासून सुरू होणारी धानखरेदी देखील विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडली. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत आले. हा प्रकार लक्षात येताच खा.प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी थेट व पत्र व्यवहाराच्या माध्यमातून धानखरेदी करीता पर्यायी गोदामांची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. एवढेच नव्हेतर शासकीय संस्थांच्या रिकाम्या इमारतींचा धान साठवणुकीसाठी उपयोग करून घेण्यात यावा, असाही सल्ला दिला होता. यानुरूप अन्न व नागरी पुरवठा विभागाने २ मे रोजी खा.प्रफुल पटेल यांच्या सुचनानुरूप परिपत्रक निर्गमित करून धानखरेदीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास जेथे मोठ्या प्रमाणात धानखरेदी अपेक्षित आहे. तेथील आश्रमशाळा, क्रीडा संकूलाच्या इमारती, वापरात नसलेल्या पाटबंधारे विभागाच्या इमारत, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा अन्य शासकीय संस्थांच्या इमारती व गोदामे अधिग्रहीत करून साठवणुक व्यवस्था करावी, असे सुचना सर्व जिल्हाधिकार्यांना करण्यात आल्या आहेत. यामुळे गोदामाअभावी केंद्रांची रखडलेली धानखरेदीचा मार्ग आता लवकरच मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकर्यांची नोंदणी ऑनलाईन प्रणालीने झाली आहे. त्यांच्या वेळापत्रकानुसार धानखरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुचना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची शृंखलेत खा.प्रफुुल पटेल सतत प्रयत्नरत आहेत, हे विशेष. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आशान्वित झाला आहे.