
नागपूर,दि03ः- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सव वर्षाचे औचित्याने भूजल पुनर्भरण व छत पाउस पाणी संकलन व जिल्हयातील भूशास्त्रीय रचना या विषयावरची ऑनलाईन वेबिनार /कार्यशाळा आज 3 जून रोजी पार पडली.कार्यशाळा डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, (भाप्रसे), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक उपसंचालक, नागपूर मंगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
सदरील कार्यशाळेला जिल्हयातील भूशास्त्रीय रचनेनुसार राबविण्यात येणा-या विविध उपाययोजना व पाणी गुणवत्ता या बाबत मार्गदर्शन तसेच जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेस जिल्हा/तालुका पातळीवरील शासकिय कार्यालयातील अधिकारी, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी व प्रतिनिधी,सरपंच,ग्रामसेवक,शेतकरी, जलसुरक्षक उपस्थित होते.
या वेबिनार मध्ये एस.एस.खोडे जिल्हा वरीष्ठ भूवैज्ञानिक यांनी जिल्हयातील भूशास्त्रीय रचना व त्यानुसार राबविण्यात येणा-या उपाययोजना तसेच विहिर पुनर्भरण या विषयावर सविस्तर सादरीकरण केले.तसेच सी.एस.कुंभारे क.भूवैज्ञानिक यांनी जिल्हयाची पाणी गुणवत्तेबाबत माहिती दिली.कार्यशाळेस ग्रामिण पाणी पुरवठा जिल्हा परीषदेचे भूवैज्ञानिक, श्री.वालदे व शिरीष बागडे साहेब, उपअभियंता (यां) नरेन्द्र वानखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.