पवनी तालुक्यात शासकिय आधारभुत धान खरेदी केंद्राचे खासदार पटेलांच्या हस्ते उदघाटन

0
20

पवनी,दि.06ः- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, पवनीच्या प्रांगणात रब्बी हंगामातील शासकिय आधारभुत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले. रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी श्री पटेल हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते. मागील काही दिवसापूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी भेट घेउन रब्बी हंगामातील शासकिय आधारभुत धान खरेदीचा प्रश्न निकाली काढण्यात आला होता. श्री पटेल यांच्या पाठपुराव्या नंतर धान भरडाई च्या संर्दभात असलेल्या राईस मिलर्सच्या विविध अडचणी सोडवुन शासकिय धान खरेदी चा मार्ग निकाली काढण्यात आला होता. यावेळी खासदार प्रफुल पटेल सोबत सर्वश्री, विलासराव शृगांरपवार, नाना पंचबुधे, धनंजय दलाल, जयंत वैरागडे, लोमेश वैद्य, विवेकानंद कुर्झेकर, विजय सावरबांधे, चेतन डोंगरे, कुंडलीक काटेखाये, तोमेश्वर पंचभाई, छोटु बाळबुधे, यादव भोगे, प्रकाश रेहपाडे, शैलेश मयुर, डाॅ.विजय ठक्कर, राजेश मेंगरे , सुरेश सावरबांधे, गोलू अलोणे , किशोर पालांदूरकर, सौ. मनोरथा जांभुळे, सौ. पुष्पाताई भुरे, सौ. रजनीताई मोटघरे, सौ. सुधाताई इखार, सौ. शोभना गौरशेट्टीवार, जोगेंद्र मोहरकर, पंकज देशमुख, आनंद धांडे व अन्य उपस्थित होते.