
तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेतून तिरोडा तालुक्यातील सरांडी बयवाडा केसलवाडा ४.४६० कि.मी. रस्त्याची दर्जोन्नतीकरिता २७९.५४ लक्ष मंजूर करवून घेतले असून या कामामध्ये ४.४६० किमीचे डांबरी रस्ते,३०० मीटर सिमेंट नाली, १० मोरी बांधकामाचा समावेश असून या रस्ता बांधकामाचे आमदार महोदयांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन संपन्न झाले कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजप जिल्हा महामंत्री मदन पटले, भाऊराव कठाणे, डॉ.रामप्रकाश पटले, रवींद्र वहिले,कृउबास संचालक दिपक पटले, उत्तम कुकडे,सरपंच अनिता कुकडे,संतोष बावनकर,उपसरपंच सोनू भांडारकर, रोहित शहारे,शिवशंकर मलेवार,ओमप्रकाश भेलावे, सुनील पडोळे, सुनीता वाळवे,मंगेश कुकडे, प्रीतीलाल कुकडे,दादरअली सय्यद, दिलीप कुकडे,बंडू चिमूरकर,रमेश मलेवार उपस्थित होते.