देवरी तालुक्यातील निखिल बन्सोड ठरला युथ आयडॉलचा मानकरी

0
26

चिचगड दि. ०७-मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, कृषि सेवा, साहित्य, कला, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल अवार्डचा माणकरी तालुक्यातील ग्राम मुंडिपार येथील निखिल तुकेश्वर बन्सोड हा ठरला आहे..
मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्याला सन्मानीत करण्यात येणार आहे. निखिल हा “द स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन पुरस्कृत” भारतीय विद्यार्थी संघटनेचा गोंदिया जिल्हा अध्यक्ष पदावर तसेच संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवरी या पदावर कार्यरत आहे. वक्तृत्वाच्या जोरावर त्याने अनेक स्पर्धा प्रथम क्रमांकाने गाजवल्या असुन विनोदी नाट्य कलावंत महाराष्ट्र शासन, सुत्रसंचालन, निवेदन, अभिनय, युवा – व्याख्यानकार, शिवराय फुले शाहू आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज बहुजन विचारधारा प्रबोधनकार, अशी त्याची ओळख आहे. यातून याने युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही २०१९ विधान भवन मुंबई येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्र विरोधी पक्षनेते म्हणून गोंदिया जिल्ह्यचे प्रतिनिधित्व केले होते.