
तर दोन गंभीर जखमी
नितीन लिल्हारे
सालई खुर्द : मोहाडी तालुक्यातील खमारी बु शेतशिवारात वीज पडून
तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन गंभीर जखमी तर एक थोडक्यात बचावल्याची घटना दि.8 मे 2021 मंगळवार रोजी सायंकाळी घडली आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरु झाल्याने शेतक-याना शेतीच्या कामाची लगबग सुरु झाल्याने शेतकरी सध्या शेतातच दिसु लागला आहे. यातच मोहाडी तालुक्यातील खमारी बु. येथील रतिराम उपराडे व अशोक उपराडे आपापल्या शेतात मजुरासोबत काम करीत होते. याचवेळी वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हे सर्व लोक शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली पावसापासुन संरक्षण करण्याकरिता थांबले. याचवेळी
विज कडकडुन या लोकावर पडल्याने सहापैकी तिघांचा दुर्दैवी
जागीच मृत झाले तर दोन गंभीर जखमी तर एक बचावले. यात अनिता फत्तु सव्वालाखे वय ४० वर्ष, आशा संपत दमाहे ४२, अशोक फिरतलाल उपराडे ४६ याचा मृत्यु झाला. तर रतिराम उपराडे ५० व पल्लवी रतिराम उपराडे १९ हे जखमी झाले. प्रमिला अशोक उपराडे हे थोडक्यात बचावले असल्याने त्यांनी आरडाओरडा करीत
परिसरातील शेतकरी घटनास्थळाकडे धावले. त्या ठिकाणी तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. माजी आमदार चरण वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.