
– राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा
चंद्रपूर,दि.09ः- महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन (दि.८) सादर करुन राजकीय आरक्षण वाचविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ओबीसींना राजकिय आरक्षण व पदोन्नती मधिल आरक्षण न मिळण्याचे महापाप बीजेपीचे असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. या अगोदर केंद्र व राज्यात सत्ता असतांना बीजेपीने ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे केंद्राच्या अखत्यारीत असुनही केंद्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समनवयक डॉ. अशोक जिवतोडे व महासचिव सचिन राजुरकर यांच्या हस्ते आमदार नानाभाऊ पटोले यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, इतर मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करा व ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याबाबत निवेदन दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत डॉ अविनाश वारजूरकर, दिनेश चोखारे, प्रकाश देवतळे, , महेंद्र ब्राह्मणवाडे,जयंता पा. जोगी, प्रेमलाल पारधी, कुणाल चहारे, शाम लेडे, रवि देवाळकर, विजय मालेकर, लिलाधर खंगार,मनोज गौरकर, , गणेश आवारी, भुवन चिने, चंदू माथाने, प्रभाकर ताजने, हितेश लोडे,राजू हिवज ,सुनील कोहपरे,देवराव दिवसे, लीलाधर तिवाडे, विलास भोयर,दिलीप पायपरे, श्रीकृष्ण लोनबले, विनोद आगलावे, गणेश कागडेलवार, रजनीताई मोरे,सुरेखा वाढरे ,मंजूषा फुलझेले, विजया बोडे आदी उपस्थित होते.