जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार कोरोना बाधित कुटुंबांना सांत्वन भेट

0
42

गोंदिया,दि.10ः-जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केलेल्या आवाहनानुसार गोंदिया तालुक्यात कोरोना रोगामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावलेल्या कुटुंबांना किराणा व्यापारी संघटना गोंदियाच्या सहाय्याने जिल्हा प्रशासनामार्फत दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येऊन त्यानुसार त्यांना आधार देण्यात आला.
कोरोना झाल्यामुळे परिवारातील प्रमुख कमावता व्यक्ती गमावल्यामुळे तसेच या भीतीपोटी सामाजिक भीती निर्माण होऊन संबंधित परिवाराचे मानसिक खच्चीकरण झाले असल्यामुळे प्रशासनातर्फे सदर परिवारांची भेट घेण्यात आली. यामुळे अशा परिवारांना मानसिक आधार मिळून इतर नागरिकांच्या मनात असलेली भीतीदेखील घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी अशा परिस्थितीमध्ये कर्ता पुरुष गमावलेल्या परिवारातील त्यांच्या विधवा पत्नीस विशेष सहाय्य योजने अंतर्गत तात्काळ लाभ मिळवून देण्याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून शासनाच्या विविध निकषांच्या अनुषंगाने देखील संबंधित परिवारास लाभ देण्यात येईल असे सांगण्यात आले.
सदरील दैनंदिन वस्तूंचे वाटप हे जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या आवाहनानुसार आदेश डफळ तहसीलदार गोंदिया, यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आशिष रामटेके अव्वल कारकून,मुकुंद तिवारी महसूल सहाय्यक,जी पी सोनवणे तलाठी यांनी पार पाडलेली आहे.