
– 97 टक्के मातांना योजनेचा लाभ
– करेक्शन क्यू मध्ये जिल्हा राज्यात तिसरा
गोंदिया,-माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत तीन टप्प्यात 5 हजार रुपये संबंधित लाभार्थ्यांना देण्यात येतो. यातंर्गत गोंदिया जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत 39848 मातांची नोंद झाली असून आतापर्यंत 38721 मातांना सदर योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्याची टक्केवारी 97.18 एवढी आहे. विशेष म्हणजे, ही योजना राबविताना काढण्यात येणार्या करेक्शन क्यू मध्ये जिल्हा राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने पहिल्या खेपेतील गरोदर मातांना गरोदरपणा कालावधीत ते बालकांचे पहिले लसीकरण चक्र पूर्ण होईपर्यंत एकूण 5 हजार रुपये तीन टप्प्यामध्ये दिले जाते. पहिला हप्ता 1 हजार रुपये, दुसरा हप्ता 2 हजार रुपये व तिसरा हप्ता 2 हजार रुपये असे स्वरुप आहे. जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत 39848 मातांची नोंद झाली असून आतापर्यंत 38721 मातांना सदर योजनेचा लाभ मिळालेला आहे. यात आमगाव तालुक्यातील 98.05 टक्के मातांना लाभ मिळाला असून अर्जुनी मोर 97.49, गोंदिया 97.19, गोरेगाव 97.13, तिरोडा 97.02, देवरी 96.95 व सडक अर्जुनी तालुक्यातील 96.68 टक्के मातांना योजनेचा लाभ मिळाला आहे. गरजू गरोदर माता यांना लाभ मिळावा या दृष्टीने करेक्शन क्यू मधील लाभार्थी वर्षनिहाय काढण्यावर भर दिला जातो.
यात ग्रामीण क्षेत्रात कार्यरत गट प्रवर्तक व आशा सेविका यांनी आऊट सोर्सींग डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या समन्वयाने राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 372 करेक्शन क्यू असून गरजू लाभार्थींना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आधार संलग्न व बँक संबंधीत करेक्शन बाबत आधार केंद्र व पोष्ट बँक खाते यांच्या अधिकार्यांशी समन्वय साधून करेक्शन क्यू काढण्यावर भर दिला जात आहे. विशेषत: इंडियन पोस्ट पेमेन्ट बँक हे कमी कालावधीत, कमी खर्च व सहज उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत खाते उघडून लाभ देणे सोपे झाले आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत बाळाचे पहिले लसीकरण सत्र संपल्यानंतर तिसरा हप्ता फॉर्म 7 दिवसात भरल्यामुळे तसेच यावर आरोग्य पर्यवेक्षीका व गट प्रवर्तक यांच्या समन्वयाने सद्यस्थितीत जिल्ह्यात 538 लाभार्थी हे तिसरा हप्ता पेंडन्सीमध्ये आहेत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची माहिती 9614804804 या क्रमांकावर उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना योजनेविषयी संपूर्ण माहिती घरबसल्या उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिपचे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी केले आहे.