
शेगाव तेल्हारा, आकोट बस सेवा बंद..
शेगाव: मुदत संपलेला अंग्रेज कालीन लोहारा नदीवरील पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शेगाव कडून निंबा आकोट अकोला तेल्हारा परतवाडा इत्यादी शहरासाठी जाण्यासाठी लोहारा मार्गे जावे लागत होते लोहारा जवळ मन नदी या मन नदीवर ज्या काळात इंग्रजांचे सरकार भारतात होते त्या काळात म्हणजे शेकडो वर्षापूर्वी या मना नदीवर पूल बांधण्यात आलेला होता या पुलाची मर्यादा संपून अनेक वर्षे झाली. त्याबाबतची अधिकृत माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रीतसर पणे देण्यात आलेली आहे मुलाची तिची मुदत संपल्यानंतरही या पुलावर शेकडो वाहनांची ये-जा सुरू राहत होती दोन जिल्ह्याला जोडणारा हा पूल केव्हाही खचु शकतो अशा इशारा देणाऱ्या बातम्या सुद्धा विविध वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या आणि आज 11 जून शुक्रवार रोजी सकाळी या पुलावरून कोंबडी घेऊन जाणार पिकप वाहन जात असतांना अचानक पुणे या फुलाचा एक अर्ध्या पेक्षा जास्त भाग खचला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीच अप्रिय घटना घडली नाही पूल खचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक वाहने अडकून पडली.. प्रशासनाला या माहिती मिळताच याठिकाणी जेसीबी द्वारे त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले शेगाव बस स्थानकावरून सुटणाऱ्या लोहारा मार्गे शेगाव तेल्हारा व शेगाव अकोट या बस रद्द करण्यात आल्या व तशा प्रकारची सूचना शेगाव बसस्थानकावर लावण्यात आलेली आहे