राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी ..जागृती सप्ताह पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0
20

गोंदिया: – लोक कल्याणकारी राजा, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज जयंती “सामाजिक न्याय दिन” निमित्त स्थानिक रैनबसेरामध्ये राज्यस्तरीय जागृती सप्ताह पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या छायाचित्रांवर पुष्पहार घालून त्यांच्या जनकल्याणकारी कार्यांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख कमांडर किरण वासनिक, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे वसंत गवळी, स्पर्धा परीक्षक प्रा. डॉ. दिशा गेडाम, आदेश गणवीर, सर्वसमाज विचार महोत्सव समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिव नागपुरे, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे, जेसीआय गोंदिया सेंट्रल च्या अध्यक्षा मंजरी मोदी, आंबेडकरी बाल संस्कार केंद्राचे संचालक महेंद्र कठाणे, प्रशिक्षक माणिक गोंडाणे, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक आभा मेश्राम, लक्ष्मी राऊत आदी उपस्थित होते. संत गुरु महामानव यांच्या मानवतावादी विचाराना जनतेपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल, सर्व समाज विचार महोत्सव समिती, महिला सशक्तीकरण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एप्रिल- मे महिन्यात “घर ​​घर जयंती” आणि “बुद्ध आले दारी” कार्यक्रम अंतर्गत बोध कथा कथा, सम्राट अशोक यांच्या जीवन इतिहास संबंधित लेख, स्तंभ, स्तूप शिलालेख माहिती, महात्मा फुले यांच्या आयुष्यातील संघर्षावर आधारित छायाचित्र प्रदर्शन, वक्तृत्व, प्रश्न मंजूषा, डॉ, बाबासाहेब आंबेडकर जीवन संघर्ष यावर प्रश्न मंजूषा, छायाचित्र प्रदर्शन, निबंध, रांगोळी सजावट, महामानवाना अभिवादन, बुद्धांचे मानवतावादी विचार लेख, बुद्ध गीत व बौद्ध कविता वाचन, हस्तकला क्राफ्ट प्रदर्शनी, रेखाचित्र / चित्रकला प्रदर्शनी, बौद्ध तत्वज्ञान, बौद्ध प्रश्न मंजूषा, वृक्षारोपण, धम्मगुरुचे बुद्ध संदेश मार्गदर्शन, बुद्ध वंदना – अभिवादन, बौद्ध व्हा – बौद्ध दिसा, अशा विविध 25 स्पर्धा धम्मगुरू विचारवंतांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन आयोजित केल्या गेल्या. ज्यामध्ये राज्य पातळीवर मोठा प्रतिसाद मिळाला. या जागृती सप्ताह स्पर्धेच्या पुढाकारात समाविष्ट जूनियर सीनियर वर्गातील सहभागी – यशस्वी विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व बक्षीस प्रदान करण्यात आले. जूनियर गटात पलक किरणापुरे (खमारी), अशिता चौरे, अंगद भालाधरे, विशाखा सोनटक्के (हिंगोली), आर्यन बनसोड, अलिशा चौहान (ढाकणी), सक्षम लाऊल, स्नेहा मेश्राम (धाकणी), निखिल भालेराव, श्रेयश टेंभेकर, विदिशा गजभिये, आर्यन बनसोड, नंदिनी बनसोड, विश्वरत्न सोनटक्के (हिंगोली), श्रेया देशभ्रतार, लिशा राऊत, विराज राऊत, अक्षयंत नागपुरे (भंडारा), हर्षल सतदेवे, शिमोन भालाधरे, श्रावणी पानतोने, मयंक जांभूळकर, आदित्य कठाणे, युवराज गौतम, संयमी देशपांडे (नागपूर), डिंपल साखरे (तिरोडी बालाघाट), वैभव टेंभेकर, सोनाली बावणे, दीक्षा शहारे (तुमखेडा-खुर्द), सुमित रामटेके (कटंगी), लता पारधी (खमारी), दिप्ती डोंगरे (अदासी), श्रेया देशभ्रतार, काजल कोरे (ठाणा), पारुल कोटांगले, श्रेयश वासनिक, श्रुती मेश्राम (धामणगाव रेल्वे), टिया काणेकर (साकोली), अनामिका सतदेवे (मुंडीपार), योगेश टेंभेकर, श्रेयश वासनिक, रौनक बनसोड, (ब्रम्हपुरी), मोनाली सरदारे, (कारंजा), प्रशित चौरे, यश रंगारी, (गुदमा), श्रुती खोब्रागडे, मन्नत रामटेके (नागपूर), प्रशिक रामटेके (नागपूर), शुभम मेश्राम (ढाकणी) , सौरभ उके (आमगाव), अनु यादव, पूजा कांबळे (अहमदनगर), रिधांश उके (लोहारा) आणि सिनियर गटातून प्रियंका गणवीर (गुदमा), धनराज दुर्योधन (राजुरा), मृणालिनी दहीवाडे (नागपूर), लक्ष्मी राऊत, प्रणय राऊत, राहुल वालदे, लोपामुद्रा शहारे (नागपूर), प्रतिमा रामटेके, मंगेश सतदेवे, धीरज डोहणे, स्नेहा राऊत (पोवारीटोला), निर्मला जांभूळकर (कटंगी), तामार डोंगरवार, (कटंगी), सुनंदा रामटेके, नीता गेडाम, लायंदा लाडे, प्रीती कांबळे (दिल्ली), तेजस्विनी संसारे (नाशिक), पंकज मेश्राम (एकोडी), रितेश शहरे (आमगाव), डॉ. सुकेशिनी बोरकर (ब्रह्मपुरी), सविता देशपांडे (नागपूर), राजकुमारी कठाणे, सीमा चौरे, मुन्नाभाई नंदागवली (बाराभती), राहुल गायकवाड (हिंगोली), ऋतुजा मनवर (आर्वी), मनोज गजभिये (मुरपार), स्वर्णा नागपुरे (भंडारा), रश्मी लोखंडे (धामणगाव, रेल्वे), संदेश आझाद, जया लोखंडे (धामणगाव), शुभम अहाके (लखनऊ), शेखर गौतम, लाल बहादुर गौतम, नंदा मनवर (आर्वी), प्रवीण राऊत (अदासी), तेजस्विनी संसारे (नाशिक), प्रतिमा रामटेके (कटंगी), सुजाता मेश्राम (धामणगाव), जूही गणवीर (गुदमा), किरण वासनिक, सुधा चौहान (पुरगाव) ), प्रणय गजभिये (काटी), मीनाक्षी मेश्राम (भिवापुर), प्रल्हाद गणवीर (गुदमा), स्नेहा राऊत, अरविंद गोंडाने (मुंबई), इंदिरा डोईफोडे (नागपूर), किसन मोरे, मिलिंद धावारे (लातूर), श्रुती मेश्राम (धामणगाव रेल्वे), अर्चना सतदेवे, सोनाली बावणे यांना पुरस्कृत करण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण समारंभाचे कुशल संचालन प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी केले तर सर्वांच्या उपस्थितीबद्दल आदेश गणवीर यांनी आभार मानले.