Home विदर्भ गोसेची 23 दारे अर्धा मिटरने उघडली

गोसेची 23 दारे अर्धा मिटरने उघडली

0

भंडारा-गोसीखुर्द धरणाच्या परिसरात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे 23 वक्र द्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 2540.465 कुमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसाची संततधार आजही सुरू होती. आलेल्या पावसामुळे वन गंगा नदीच्या पात्रात काही अंशी वाढ झाली. परिणामी गोसीखुर्द धरणातील पाण्याची पातळी वाढली. धरणात 243. 650 मीटर एवढे पाणी सध्याच्या घडीला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून धरणाची 23 दारे 0.50 मिटर ने उघडली आहेत. यातून 2540.465 कूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version