
गोंदिया,दि.25ः- जिल्याच्या अतिदुर्गम देवरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आज एकात्मिक बाल विकास कार्यालयामार्फत देण्यात आलेला मोबाईल परत करीत आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. एकात्मिक बाल विकास विभागा मार्फत अंगणवाड्या चालविल्या जात असून अंगणवाड्यांची तसेच विद्यार्थ्यांची योग्य माहिती शासनाला पुरविण्यात यावी यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते.तर या मोबाईल मध्ये चालणार साफ्टवेयर हा इंग्रजी भाषेत असल्याने बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ते भरणे देखील जमत नाही.मोबाईलची रॅम देखील कमी असल्याने मोबाईल व्यवस्थित चालत नसून माहिती भरायला अडचण होत असल्याने तसेच उशिरा माहिती अंगणवाडी सेविका देत असल्याने अंगणवाडी सेविकांचे पगार देखील कापले गेले.आधीच अल्प पगारात काम करतांना हे परवडणारे नाही.त्यामुळे शासनाने मराठी किंवा हिंदी भाषेत चालणारे सॉफ्टवेयर टाकून तसेच रॅम वाढवून नवीन मोबाईल द्यावे अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी करीत त्यांच्याजवळ असलेले जुने मोबाईल आज एकात्मिक बाल विकास कार्यलयाला परत केले. यावेळी कु. कुमुद एनपेडिवार देवरी (अध्यक्ष) सौ. सुनीता डिये डोंगरगांव (सचिव) सौ. अल्का बिसेन देवरी (कोषाध्यक्ष) सौ. आशा तोरणकर (उपाध्यक्ष) सौ. दृंदा मैठाम डोंगरगांव ( सह सचिव) सौ. सरिता रहिले, सौ. सुनंदा रामटेके, सौ. रेखा नाईक, सौ. चंद्रकला औरासे, सौ. हस्तकला उइके, सौ. मिना राठौड़ आदि उपस्थित होते.
त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अंगणवाडी सेविकांनी सुध्दा आपले मोबाईल नागरी बालकल्याण विभागाला परत केले.यावेळी हौसलाल रहागंडाले,विठा पवार,प्रणिता रंगारी,प्रतिभा दहिकर,आशा कोल्हे,महेश्वरी बिसेन,चंदा मेश्राम,माया बोरकर,कल्पना मेश्राम,निलिमा बनसोड,स्मिता बनसोड,रश्मी बर्वे,चेतना लोंगभासे,लक्ष्मी मनघटे उपस्थित होते.