Home विदर्भ जटपुरा गेट वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी समिती गठीत

जटपुरा गेट वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी समिती गठीत

0

चंद्रपूर,दि.१४- शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व विविध उपाययोजना आंमलात आणण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकारी व शहरातील नागरिकांची समिती गठीत करण्याचा निर्णय झालेल्या स्टॅंडिंग बैठकीत जाहीर केला. आज जटपुरा गेट येथे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे, आ संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर व शहरातील नागरीक उपस्थित होते.हा किल्ला कुठल्याही परिस्थितीत तोड़ला जाणार नाही अशी हमी देत पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, यातून मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न केला जाणार आहे. जटपुरा गेट येथील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचवेल असेही त्यांनी सांगितले. 31 डिसेंबरला एक रस्ता सुरु करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

Exit mobile version