Home विदर्भ कोरची तालुक्यात हिवतापाची साथ: ६० रुग्ण भरती

कोरची तालुक्यात हिवतापाची साथ: ६० रुग्ण भरती

0

कोरची, दि.१४: येथील एक रुग्ण स्वाईन फ्लूने दगावल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच तालुक्याला हिवतापाच्या भयावह साथीने ग्रासल्याची बाब निदर्शनास आली आहे. तालुक्यातील दीडशेहून अधिक नागरिक हिवतापाने फणफणत असून, तब्बल ६० रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कोरची येथील महेश राऊत या ३० वर्षीय युवकाचा काल(ता.१३) स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यानंतर आज तब्बल ६० रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.तालुक्यात हिवतापाची साथ असताना व तब्बल ६० रुग्ण भरती असताना गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून डॉक्टरांचे अतिरिक्त पथक कोरचीला पाठविण्याची तसदी जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतलेली नाही

Exit mobile version