भारतीय कम्युनिस्ट पार्टी ११आॅक्टोबर महाराष्ट्र बंद निमित्त निदर्शने आंदोलन

0
17

गोंदिया,दि.11--भारतीय कम्युनिस्ट पार्टी व महाराष्ट्र राज्य किसान सभेने ११आँक्टोबरला महाराष्ट्र बंद आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा देत आज नविन प्रशासिय इमारती समोर मोर्चा निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून
राष्ट्रपती यांचे नावे एसडीओ यांना निवेदन दिले.निवेदनात ३ ऑक्टोंबर रोजी लखिमपुर खिरी (उत्तरप्रदेश) येथे शेतकऱ्यांना चिरडून त्यांना दिवसाढवळ्या क्रूरपणे मारल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश संतापला आहे.मोदी- योगी सरकार गुन्हेगा-यानां वाचविण्याचे घोर निषेधार्ह कार्य करत आहे,त्याचा निषेध करण्यात आला. या निदर्शने आंदोलनात प्रामुख्याने का.प्रल्हाद ऊके ((तालुका सचिव),का.करूणा गणविर (राज्य कौंसिल सदस्य)सि.के. ठाकरे , सुरेश रंगारी,नामदेव पंधरे,जितेंद्र गजभिए,साजीद कुरैशी ,रमेश सोनवणे,शेख ईस्राईल,सुरेंद्र ऊके,चंद्रकला नागपुरे ई.कार्यकर्ते शामील होते प्रेषित निवेदनात नमुद करण्यात आले की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करण्यात यावे ,मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याचा साथीदार मोनु यांच्यावर 302 खुनाचा गुन्हा दाखल होवुन अटक झाल्यावर पोलिस कस्टडीत त्याची आवाभगत बंद व्हावी ,,सदर घटनेचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीने करावे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर घटनात्मक पद धारण करताना हिंसा बळकावल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहे त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात यावे, तिन किसान विरोधी काळे कायदे रद्द करणे व ईतर महत्वाच्या मागण्यांचां शमावेश आहे.