गोंदिया,दि.10 : पणन हंगाम 2021-22 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व
भरडधान्याच्या किमान आधारभूत किमती केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार धान/भात
साधारण किमान आधारभूत किंमत 1940 रुपये प्रती क्विंटल व शेतकऱ्यांना द्यावयाचा प्रत्यक्षात दर 1940 रुपये प्रती
क्विंटल. धान/भात ‘अ’ दर्जा किमान आधारभूत किंमत 1960 रुपये प्रती क्विंटल व शेतकऱ्यांना द्यावयाचा प्रत्यक्षात दर
1960 रुपये प्रती क्विंटल आहे. सदर जाहीर केलेल्या किमतीनुसार पणन हंगाम 2021-22 अंतर्गत किमान आधारभूत
किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत हमी भावाने धान खरेदी करण्यात येईल.
धान खरेदी केंद्रावर कोणत्याही परिस्थितीत नॉन एफ.ए.क्यू. दर्जाचे धान खरेदी केले जाणार नाही. तसेच
दररोज सायंकाळी खरेदी केंद्रे बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले, परंतू खरेदी न झालेले धान/भरडधान्य
सांभाळण्याची जबाबदारी संबंधीत शेतकऱ्यांचीच राहील, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. असे
जिल्हाधिकारी,गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.