Home विदर्भ काँग्रेस ओबीसी आघाडीनेही दिले धरणे

काँग्रेस ओबीसी आघाडीनेही दिले धरणे

0

नागपूर दि-८: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी आघाडीच्यावतीने ओबीसीच्या प्रश्नावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आले.त्यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण करून योजनांमध्ये पात्र ओबीसींना आरक्षण मिळावे. ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यात यावी.आदिवासी जिल्ह्यांमधील ओबीसी आरक्षणाची तफावत दूर करावी.ओबीसींना शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी. नॉन क्रिमीलेयरची मर्यादा ६ लाखाच्यावर करण्याचा शासन निर्णय तत्काळ लागू करण्यात यावे या मागण्याना घेऊन आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Exit mobile version