गोंदिया,दि.9- /येथील कृष्णापुरा वाॅर्ड मधील राजू फुट वियरच्या तीन मंजली गोदामाला रात्री तीन वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. कृष्णापुरा वाॅर्ड हा रहिवासी परिसर आहे. तसेच येथील गल्ली सुद्धा अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवताना खूप त्रास सहन करावा लागला.