Home विदर्भ कनिष्ट अभियंता दमाहेला उपसरपंचाची जिवे मारण्याची धमकी

कनिष्ट अभियंता दमाहेला उपसरपंचाची जिवे मारण्याची धमकी

0

तिरोडा,दि.9-गोदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या पंचायत समितीमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता  पी.एम.दमाहे यांना मुंडीकोटा ग्रामपंचायतचे उपसरपंचाने पंचायत समिती कार्यालयात जाऊन जिवे मारण्याची धमकी देत अश्लील शिविगाळ केल्याची घटना नुकतीच घडली.या घटनेमुळे पंचायत समिती कर्मचारी वर्गामध्ये असतोंष उफाळून आला असून जोपर्यत संबधित उपसरंपचावर कारवाई केली जात नाही,तोपर्यंत काळ्याफिती लावून काम करण्याचा इशारा दिला.उपसरपंच देवेंद्र मंडपे यांच्या या कृतीबद्दल तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी शासकीय कर्मचारीच्या कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल मंडपेविरु्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.या मंडपे यानी केलेल्या शिविगाळ प्रकरणाचा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अद्यक्ष पी.जी.शहारे,सबार्डिनेट इंजिनिर्यस असोशिएशनचे(एमएसईबी)संघटनेचे इंजी.हरिश डायरे यांनी सुध्दा निषेध नोंदवित अशा लोकप्रतिनिधीवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.तिरोडा पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करुन घटनेचा निषेध नोंदविला आहे.

Exit mobile version