अर्जुनी मोरगाव : जिल्ह्यासह तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे दररोज कुठे ना कुठे किरकोड अपघात घडून येत असतात. या अपघतांमध्ये अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले आहे. याच आठवड्यात गोंदिया येथील रिंगरोड मार्गावर दोन दिवसात दोन विद्याथिंर्नींचा ट्रक अपघातात जीव गमवावे लागले आहे. मात्र प्रशासनाला कडून कसलीही व्यवस्था अद्याप करण्यात आली नसून सतत दुर्लक्ष केले जाते आहे. त्यातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अजुर्नी ते इटखेडा बायपास रस्ता पुर्णत: उडलेला आहे. तसेच इसापूर-खामकुरा, खामखुरा – येगाव- जानवा हे बायपास मार्गाची पुर्णत: दुरावस्था झाली आहे. या मार्गावरील प्रवास्यांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान अनेकदा किरकोळ अपघात सुद्धा घडून येत आहेत. करिता तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अजुर्नी मोरगाव तालुका आदिवासीबहुल दुर्गम नक्षलग्रस्त तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेला हा तालुका असून या तालुक्याला लागून भंडारा, गडचिरोलीस, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा प्रदीर्घ कालावधी लोटून सुद्धा गोंदिया जिल्ह्यातील अजुर्नी मोरगाव तालुक्यातील जनतेला दळणवळणासाठी चांगले रस्ते मिळू शकले नाही. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. अजुर्नी मोरगाव तालुका हा अजुर्नी या शहरापासून जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर बसलेल्या खेड्यांचा तालुका आहे. मात्र ग्रामीण जनतेला जाण्या-येण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांची दैनावस्था झाली असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील महागाव-शिरोली ते केशोरी रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असून रस्ता जागोजागी उखडलेला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासादरम्यान अनेक अपघात झालेले आहेत. तसेच अर्जुनी ते इटखेडा बायपास रस्ता पूर्णता उकडलेला आहे. इसापूर ते खामकुरा बायपास रस्ता उखडून गेलेला आहे खामखुरा येगाव जानव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे कोरंबी ते जाणवा या रस्त्याची सुद्धा दैनावस्था झालेली आहे एकंदरीतच अर्जुनी-मोर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दैनावस्था झाली असून या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जनतेकडून होत आहे