गोंदिया-स्थानीय एम जि परमेडिकल कॉलेज येथे नुकताच सिकल सेल जनजागरण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या जनजागरण सप्ताह चे उदघाटन केटीएस च्या वरिस्ट वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांचे हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम जी परमेडिकल चे संचालक अनिल गोंडाने व कॉलेज च्या प्राचार्य अनुसया लिलहारे जि प च्या सिकल सेल समनवयक स्वप्ना खंडाईत केटीएस च्या समुपदेशिका निशा डहाके नितु फुले प्रयोगशाळा तंत्रज्ञान नायकाने पारधी एम सॅक च्या समुपदेशिका सौ आझाद प्रा राणा आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सिकल सेल जनजागरण सप्ताह बाबत प्रास्ताविक श्रीमती नितु फुले यांनी केले गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभाग मार्फत सिकल सेल प्रतिबंध कार्यक्रम कश्या पद्धतीने राबिविला जातो या बाबत माहिती श्रीमती स्वप्ना खंडाईत यांनी दिली. गोंदिया बी जी डब्लु रक्त पेढी मार्फत सिकल सेल बालकांना मोफत रक्त संक्रमण सुविधा पी आर ओ अनिल गोंडाने यांच्या तर्फे अविरत दिली जात असल्याबद्दल त्यांचा जिल्हा सिकल सेल डेस्क तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना केटीएस च्या वरिस्ट वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या की सिकल सेल हा एक आनुवंशिक आजार आहे एका पिढी तुन दुसर्या पिढी कडे संक्रमित होतो
म्हणून पालकांनी आपल्या मुलांमुलींचे लग्न जुळवितांना जन्म कुंडली जुळविण्यापेक्षा आरोग्य कुंडली तपासून लग्न करावेत म्हणजे सिकल सेल या गंभीर आजाराचे उच्चाटन शक्य होईल. डी एम एल टी च्या विध्यार्थ्यांना आवाहन केले की प्रत्येकाने आपले सिकल स्टेटस माहीत करून घेतलेच पाहिजे. या वेळी एम जी परमेडिकल संस्थेतर्फे सिकल सेल जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्राचार्य श्रीमती अनुसया लिलहारे यांचा सत्कार करण्यात आला या नंतर केटीएस जिल्हा हॉस्पिटल च्या चमूने कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे मोफत सिकल केलं स्क्रिनिंग करून दिले व समुपदेशन केले. एम जी परमेडिकल कॉलेज चे स्टाफ ने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्शिम घेतले.